Mazi Sindhumay by Prof. Dilip Sonawane
श्री. दिलीप सुखदेव सोनवण यांनी सेवानिवृत्तीनंतर केवळ विरंगु म्हणून नव्हे तर भावी पिढ्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून सुरूवातीला ‘सुखसिंधू’ हा वडिलांच्या चरित्रग्रंथाची निर्मिती केली. ‘सुखसिंधू’ तसे केवळ वडिलांचे चरित्र असले तरी त्यात त्यांच्या मातोश्रींचाही उल्लेख पानोपानी आढळतो आणि ते साहजिकच आहे. कदाचित लेखकाला ‘सुखसिंधू’मध्ये आपल्या मातोश्रींच्या चरित्राला आवश्यक तेवढा न्याय देता आला नाही याची जाणीव झाल्याने त्यांनी आईचे स्वतंत्र चरित्र लिहिण्याचा विचार केला असावा. परंतु आईच्य चरित्रात देखील पानोपानी वडिलांचे चरित्र डोकावते आहे, ते देखील साहजिक आहे.
आईवडिलांवर निरपेक्ष प्रेम करणारी भाबडी मुले आज दुर्दैवाने कमी होत चालली आहेत. हे वेदनादायक असले तरी सत्य आहे. यात सत्यता नसती तर जागोजागी वृद्धाश्रम दिसले नसते. वृद्धाश्रम हा मानवी जीवनावरचा कलंक आहे. श्री दिलीप सोनवणेसारखा एक भाबडा मुलगा आईवडिलांच्या बाबतीतील आदर व कृतज्ञता दाखविताना कधी कधी फारच हळवा होतो.
पूर्वीच्या सासूच्या सासुरवासामुळे अनेक सुनांचं तारूण्य खुडलं गेलंय. तो सासुरवास छळवणूक होती स्वतःची वडिलांची मानसिक घुसमट समर्थ शब्दांत व्यक्त करतो. अस्वस्थ पण अगतिक आहे. अशिक्षित, अल्पशिक्षित सुना तो सासुरवास सहन करण्याची त्यांच्या जन्मदात्यांकडून प्राप्त करीत असत. पूर्वीच्या लग्न झाल्यावर सासरी जाणाऱ्या मुलीला आईबाप एक देत असत. ‘सासरी जाताना उभ्याने जा, सासरमधून पडताना आडवी बाहेर पड.’ अर्थ तुझं कसंही असो, छळवणूक होवो, तू मरतानाच बाहेर पडायच. या शिकवणुकीमुळे अनेक सुनांनी असहय सासुरवास करूनही त्यासंबंधी कधीही सहनशक्ती कमी झाली आणि दररोज वर्तमानपत्रात सुनांच्या आत्महत्या, विवाहानंतर दोन महिन्यात घटस्फोट, हुंडाबळीच्या कहाण्या, वाचायला मिळतात. अनेक कुटुंबाच्या वैवाहिक जीवनात अनावश्यक भूकंप होताना दिसतात.
पतीची प्राथमिक शिक्षकाची नोकरी, पतीचा स्वाभिमानी स्वभाव, तुटपुंजा पगार, त्या पगारातले अनेक वाटेकरी, वेळावेळी होणारी या दुष्टचक्रात लेखकाची आई चरकात घातलेल्या ऊसासारखी पिळवटून निघते.
‘माझी सिंधूमाय’
Mazi Sindhumay by Prof. Dilip Sonawane
Mazi Sindhumay by Prof. Dilip Sonawane
Reviews
There are no reviews yet.