The Intelligent Investor Benjamin Graham Book (Atul Kahate ,Marathi) Manovikas Publication
दहा लाख छापील प्रतींहून जास्त विक्री झालेलं पुस्तक
आजच्या शेअरबाजारासाठी ग्रॅहमच्या चिरकालीन संकल्पनांची अद्ययावत टिपण्यांसह मांडणी
विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. १९४९ सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. ग्रॅहॅमच्या धोरणांमधल्या चातुर्याचा अनुभव शेअरबाजारातील गेल्या अनेक वर्षांमधल्या घडामोडींदरम्यान आलेलाच आहे. ग्रॅहॅमच्या मूळ लिखाणाला धक्का न लावता अर्थक्षेत्रामधला मान्यवर पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेसन झ्वाईग यांची अद्ययावत टिप्पणी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. यामुळे आजच्या शेअरबाजाराशी सुसंगत असलेल्या मुद्द्यांनाही हे पुस्तक स्पर्श करतं. तसंच ग्रॅहॅमनं दिलेली मूळ उदाहरणं आणि आजच्या आर्थिक विषयांबद्दलचे मथळे यांच्यामधलं साम्यही अधोरेखित होतं. तसंच ग्रॅहॅमच्या तत्त्वांचा नेमका कसा वापर करायचा याची आणखी सखोल जाण वाचकांना लाभते. आपली आर्थिक उद्दिष्टं कशी गाठायची याविषयीचं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि अजोड पुस्तक आहे.
ग्रॅहॅमच्या अफाट आणि लोकप्रिय अशा यशाच्या मुळाशी असलेल्या तत्त्वांची पुरती ओळख या पुस्तकाद्वारे होते. ‘मनी’ मासिक
बेंजामिन ग्रॅहॅम (१८९४-१९७६) यांना ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगचा जनक’ म्हणून ओळखलं जातं. आजच्या अनेक यशस्वी उद्योजकांचे ते आदर्श ठरले आहेत. ‘सिक्युरिटी अॅनॅलिसिस’ आणि ‘द इंटरप्रिटेशन ऑफ फायनॅन्शियल स्टेटमेंट्स’ ही त्यांची इतर पुस्तकं आहेत. जेसन इवाईग ‘वॉल स्ट्रीट जर्नल’साठी ‘ट इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ या नावाचं साप्ताहिक सदर लिहितात. पूर्वी ते ‘मनी’ मासिकात वरिष्ठ लेखक म्हणून काम बघत असत. ‘फॉर्च्यून’ मासिकासाठी ते आमंत्रित लेखक म्हणून अधूनमधून लिखाण करतात. १९८७ सालापासून त्यांनी गुंतवणूक या विषयावर नियमितपणे