Nisargopchar Nature Cure by Dr.H.K.Bakharu
General Info :
- Name – The Complete Hanbook Of Nature Care ( निसर्गोपचार )
- Author – Dr.H.K.Bakharu
- Language – Marathi
- Publication – Jaico
- Book Type – Health Book
Detail Iformation :
डॉ.एच.के. बाखरू हे प्रसिद्ध राष्ट्रीय मान्यता प्राप्त निसर्गोपचार तज्ञ आहेत.त्यांनी लिहिलेले हे पुस्तक मूळ इंग्रजी भाषेत आहे. The Complete Hanbook Of Nature Care हे त्याचे इंग्रजीतील नाव असून मराठी आवृतीचे नाव निसर्गोपचार असे आहे.निसर्गोपचार वरील हे संपूर्ण व परिपूर्ण असे पुस्तक असून राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट सेलर पुस्तक आहे.
गेल्या काही वर्षात निसर्गोपचाराच्या लोकप्रियतेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पाश्चिमात्य औषधोपचार आणि अॅलोपॅथीच्या मर्यादा हळू लोकांच्या लक्षात येऊ लागल्या आहेत. ते आता रोगांवर उपचार करण्यासाठी निसर्गोपचारांचा उपयोग करू लागले आहेत.
या पुस्तकामध्ये डॉ. एच. के. बाखरू यांनी निसर्गोपचाराच्या विविध पद्धतीविषयी आणि त्यांच्या उपयुक्ततेविषयी सविस्तर माहिती दिली आहे. नैसर्गिक अन्नपदार्थ आणि नैसर्गिक घटक, योगा आणि नैसर्गिक नियमांचं पालन केलं तर रोग बरे होऊ शकतात हे त्यांनी वाचकांना सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे. आहारातल्या पौष्टीक घटकांविषयीसुद्धा त्यांनी माहिती दिली आहे.
निरोगी राहण्याचा हक्क हा फक्त डॉक्टरांचाच नसून सर्वांचाच तो हक्क आहे हे बाखरुनी आवर्जुन सांगितलं आहे. प्रत्येक रोगाची कारणं आणि त्यावरचा उपचार या विषयी त्यांनी अतिशय सहज आणि सोप्या शब्दात समजावून सांगितलं आहे.
रोगांवर नैसर्गिक पद्धतीनं उपाय शोधाणाऱ्या प्रत्येकाला या पुस्तकाचा लाभ घेता येईल. साधं आणि निरोगी जीवन जगण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल असंच आहे. निसर्गोपचार शिकणारे विद्यार्थी आणि निसर्गोपचार डॉक्टर्स यांनासुद्धा संदर्भग्रंथ म्हणून या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल.
निसर्गोपचार तज्ञ आणि बहुप्रसवी लेखक डॉ. एच. के. बाखरु यांनी निसर्गोपचार या विषयावर अनेक निबंध आणि लेख लिहीले आहेत. आरोग्य आणि आहार तसेच वनौषधी या विषयांवर विविध वर्तमानपत्रांमध्ये आणि नियतकालिकांमध्येक त्यांचे असंख्य लेख प्रसिद्ध झाले आहेत.
Reviews
There are no reviews yet.