स्मशान –
जन्मापासून सुरू झालेला माणसाचा प्रवास हा स्मशानात येऊन थांबतो. सुख आणि दुःखाच्या दोन ध्रुवांत आंदोलित होत जिवंतपणी मरणाशी संघर्ष करीत मनुष्यजीव वाटचाल करतो. स्मशान ही अखंड संघर्षाची वाटचाल अभिव्यक्त करणारी व नियतीचा खेळ मांडणारी कादंबरी आहे. पोटाची आग शमविण्यासाठी स्मशानातील प्रेतांवर अग्निसंस्काराचे काम स्वीकारलेला विमोद आणि निपुत्रिक शेठजींच्या कुटुंबाचा परिघ या कादंबरीला लाभला आहे.
या कादंबरीतील सर्वच पात्रे परिस्थितीने हतबल झालेली असून त्यांचा दु:खद शेवट झाला आहे. त्यामुळे कादबरीला कारुण्याची किनार आहे. सयमाचा मृत्यू, शरणूचे वेडाचार शेठजींच्या पत्नीचा मृत्यू या घटना दुःखाचे गहिरेपण मांडतात; तर शेठजींनी शरणूला दत्तक घेणे त्याच्यावर उपचार करणे, त्याचे लग्न लावून देणे या सुखद घटनांची वीणही लेखिकने विणली आहे. वेडा झालेल्या शरणूचा विमोदकडून शेठजकडे आणि पुन्हा शेटर्जीकडून बिनोदकडे हा प्रवास मानवी जीवनातील चढ-उतारांचे दर्शन घडवितो.
घाणी –
घाणी : मनाला चटका लावणाऱ्या घटनांचा बोलका चित्रप्रवास
सौ.कविता पाचंगे यांनी आपल्या निरीक्षणातून, अनुभवांतून साहित्य प्रांता घाणी या पहिल्याच साहित्यकृतीतून स्त्री जीवनातील वेदनेचे वास्तव चित्र साकारले आहे. आपला संसार सुखी करण्यासाठी आजन्म दारिद्र्याशी लढणाऱ्या एका ग्रामीण स्त्रीची ही कहाणी मैलाचा दगड ठरावी.
मनाला चटका लावणारा बनीच्या जीवनाचा शेवट अखिल स्त्री जातीच्या दुःखाचे प्रतिनिधित्व करतो. पोटच्या गोळ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईचे समर्पण प्रभावीपणे मांडण्यात लेखिका यशस्वी ठरल्या आहेत
Reviews
There are no reviews yet.