जीवनशैली बदलणं अवघड आहे ;
आहार बदलणं आपल्या हातात आहे .
आहार जीवनशैलीशी सुसंगत असणं, ही मूलभूत गोष्ट आहे. आपण जीवनशैलीशी सुसंगत आहार याचा अर्थ सोयीचा काढला आहे. आपल्या दृष्टीनं सोयीचा आहार म्हणजे उभ्या उभ्या कुठेही खाता येईल, पटकन पोट भरल्याचं समाधान देईल, जिभेशी सलगी साधेल आणि झटपट तयार होईल असा आहे. आहाराच्या बाबतीत आपण सारे निरक्षरांच्या जमातीत मोडतो. अन्नमय शरीरासाठी व्यक्तिगत जीवनशैलीचा विचार करून आहाररचना करणं, हे आपलं उद्दिष्ट व्हायला हवं. निरोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि जगासाठी हे उद्दिष्ट साध्य करायलाच हवं.