जग प्रसिद्ध विनोदी कलाकार चार्ली चैप्लिन हे विनोदाचे बादशहा होते आपल्या अभिनयातून हावभावातून त्यांनी संपूर्ण जगाला खूप हसवले आहे .नेहमी हसरा दिसणाऱ्या या चेहर्यामागे देखील खूप वेदना लपलेल्या आहेत .ते लोकाना न दाखवता फक्त आनंद वाटत फिरणाऱ्या या कलाकाराच्या हसऱ्या चेहऱ्यामागचे दुखः लेखक भा.द.खेर यांनी त्यांची व्यक्तीरेखा साकारताना आपल्या लेखनातून खूप प्रभावीपणे मांडले आहे. ह्या हसऱ्या चेहऱ्या मगच दुखः पाहताना आपल्या मनाला हळहळ लागून जाते .स्वतः बद्दल सांगताना चार्ली म्हणतो .
‘माझ आयुष्याच नाट्यमय आहे .
तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव
माझ्या चित्रपटांवर पडणारच .
त्यातील सार वास्तव
मी स्वताच अनुभवल्याने
माझे चित्रपट जिवंत वाटतात .
नकळत मी लोकांना
जीवनातील दु:ख दाखवून देतो.
आपल्या हसऱ्या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणाऱ्या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.