वाचकांचे मनोरंजन करत डोळ्यांत अंजन घालणारा कथासंग्रह
- नाव – तो स्पर्श
- प्रकार – कथासंग्रह
- लेखिका – कविता पाचन्ग्रे खरात
- प्रकाशन – हृदय प्रकाशन
- पृष्ठ संख्या – 120
- ISBN No – 978 93 93129 90 1
कथा हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. मराठी साहित्यात दिग्गजांनी कथालेखन करून या साहित्य प्रकाराची समृद्धी वाढवलेली आहे. नागर कथा, ग्रामीण कथा, दलित कथा विनोदी कथा, अद्भुत आणि भय कथांनी हा साहित्य प्रकार व्यापलेला आहे. आबालवृद्धांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचे कार्य या प्रकाराने आजपर्यंत केले आहे.
सौ. कविता पाचंग्रे यांचा तो स्पर्श हा कथासंग्रह समाजातील विविध घटना-प्रसंगांवर भाष्य करत प्रबोधन करणारा आहे. कौटुंबीक भावजीवन, ग्राम आणि नागर जीवनमानातील फरक, मुलांची संवेदनशीलता, पिढ्यांतील अंतर, वंचितांचे शिक्षण, बालविवाह, व्यसनाधीनता स्त्रीभ्रूणहत्या अशा विविध प्रभावी विषयांना पाचंग्रे यांच्या कथा आपल्या कवेत घेतात, त्यावर घटना प्रसंगांची चांगली गुंफण करतात. वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्या कथेत निश्चितच आहे.
साधी-सोपी-प्रभावी भाषा, समयोचित संवाद, आपल्याच परिघातील पात्रे, उत्तम निवेदन शैली यांमुळे या कथा वाचनीय झाल्या आहेत. खालील कथा आपल्याला या कथा संग्रहात वाचायला मिळतील .
- नाळ गर्भाची
- ती रात्र
- ओझ मंगळसूत्राच
- वेणी
- भिंत फ्लॅटची
- वेदू
- कोपरा मनाचा
- वेदना
- दाह
- रद्दी
- गुदमरलेली लेखणी
- तो स्पर्श
- हव्यास
वरील कथा वाचताना अगदी आपल्याला खिळवून ठेवतील आणि आपल्या मनाचा ठाव घेतील .










Reviews
There are no reviews yet.