बरीच माणसं उन्हाळी दिवसात मोकळ्या माळावर सशाच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यासारखं निर्हेतुक आयुष्य व्यतीत करत असतात. एका सशामागे लागलेल्या कुत्र्याला अचानक दुसरा ससा दिसला, की पहिल्याची पाठ सोडून कुत्रा दुसऱ्याच्या मागे धावू लागतो. दुसरा ससा तावडीत सापडायच्या बेतात असतानाच त्या कुत्र्याला तिसरा ससा दिसतो. मग कुत्रा तिसऱ्याच्या मागे पळू लागतो. वेगवेगळ्या दिशांना धावणारा कुत्रा दिवसाअखेर थकून जातो पण त्याच्या हाती एकही ससा मात्र लागत नाही.
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त यश मिळवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या महत्त्वाकांक्षी लोकांसाठी ‘यश तुमच्या मुठीत’ (सक्सेस रेसिपी) हे पुस्तक लिहिलं आहे. अनुभवानं सिद्ध झालेल्या, व्यवहारात सहजपणे उतरवता येण्याजोग्या, साध्यासुध्या कल्पना, पद्धती आणि डावपेच या पुस्तकात तुम्हाला मिळतील.