स्मशान – सौ.पा.ख.कविता (कविता पाचंग्रे खरात )
जन्मापासून सुरू झालेला माणसाचा प्रवास हा स्मशानात येऊन थांबतो. सुख आणि दुःखाच्या दोन ध्रुवांत आंदोलित होत जिवंतपणी मरणाशी संघर्ष करीत मनुष्यजीव वाटचाल करतो. स्मशान ही अखंड संघर्षाची वाटचाल अभिव्यक्त करणारी व नियतीचा खेळ मांडणारी कादंबरी आहे. पोटाची आग शमविण्यासाठी स्मशानातील प्रेतांवर अग्निसंस्काराचे काम स्वीकारलेला विमोद आणि निपुत्रिक शेठजींच्या कुटुंबाचा परिघ या कादंबरीला लाभला आहे.
या कादंबरीतील सर्वच पात्रे परिस्थितीने हतबल झालेली असून त्यांचा दु:खद शेवट झाला आहे. त्यामुळे कादबरीला कारुण्याची किनार आहे. सयमाचा मृत्यू, शरणूचे वेडाचार शेठजींच्या पत्नीचा मृत्यू या घटना दुःखाचे गहिरेपण मांडतात; तर शेठजींनी शरणूला दत्तक घेणे त्याच्यावर उपचार करणे, त्याचे लग्न लावून देणे या सुखद घटनांची वीणही लेखिकने विणली आहे. वेडा झालेल्या शरणूचा विमोदकडून शेठजकडे आणि पुन्हा शेटर्जीकडून बिनोदकडे हा प्रवास मानवी जीवनातील चढ-उतारांचे दर्शन घडवितो.
Reviews
There are no reviews yet.