Nana Mi Saheb Zalo (Paperback, MARATHI, VISHNU AUTI)
एक प्रसिद्ध म्हण आहे की, ‘पायात नसलेल्या बुटांचे मला काही वाटेनासे झाले, जेव्हा मी पाय नसलेला माणूस पाहिला. ‘स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांच्या जीवनात अनेक अडचणी, अडथळे, संकटं असतात किंवा येत राहतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील अडचणी आभाळभर वाटत असतात पण विष्णू औटीचं चरित्र वाचतांना सारखं जाणवत राहत की अरे कमीत कमी देवाने माझे शरीर तरी धडधाकट बनवलंय. हा कसला देवी परिवार आहे ज्याच्या घरातील महत्त्वाच्या सर्व व्यक्ती दिव्यांग असतांनाही व अत्यंत हलाखीचे दिवस काढूनही कुंभारवाडी ता. पारनेर येथील विष्णू दिल्लीला UPSC च्या धोलपूर हाउसला एकदा नव्हे तर तीनवेळा धडक मारून अखेर यशस्वी होऊनच दाखवतो.
विष्णूच्या लहानपणापासूनचे त्याचे कष्ट, परिवाराचा संघर्ष, हतबल होण्यासारखी परिस्थिती असतांनाही या साऱ्यांवर मात करण्याची दुर्दम्य इच्छा, अपयशाला हरवण्याची जिद्द, न थकण्याची चिकाटी व यश मिळाल्यावरही मातीत पाय रोवून मातीशी इमान राखणाऱ्या विष्णूचा हा संघर्ष मुळातून त्यांच्याच शब्दात फक्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनीच नव्हे तर जीवनात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्यांनी जरूर वाचावा असा आहे.