Ghani Bhag 2 (Kavita Pachangre Kharat,Marathi,Paperbacks)

Original price was: ₹200.00.Current price is: ₹161.00.

नाट्यमय कथेचा सुखांत Ghani Bhag 2 (Kavita Pachangre Kharat,Marathi,Paperbacks)

घाणी भाग २

लेखिका कविता पाचंग्रे यांच्या घाणी आणि स्मशान या दोन्ही कादंबऱ्या वाचताना एखाद्याच्या अश्राप जीवनात इतकं विदारक दुःख असू शकतं याचा प्रत्यय पदोपदी येत होता. घाणी या कादंबरीत ‘पुढे काय घडले असेल?’ या प्रश्नानं मनात थैमान घातलं होतं. आणि साहजिकच घाणी भाग-दोन वाचताना नायिका असलेल्या घाणीबद्दल एक सहानुभूती होती. जी दारिद्र्याने पिचलेल्या वाड्या-पाड्यावरील बालजीवनाचे प्रतिनिधित्व करीत होती. या बालनायिकेच्या दुखऱ्या आयुष्याला नाट्यमय वळण देऊन वाचकांना सुखद धक्का देत कादंबरीचा झालेला शेवट तृप्त करून जातो.

पाड्यावरील बोलीभाषेतील संवाद वाचताना घटनेचं प्रत्यक्ष चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. या बोलीतील शब्दांचा छोटेखानी कोश कादंबरीच्या शेवटी देऊन लेखिकेनं वाचकांस सुलभ आकलनाचा प्रत्यय दिला आहे. दगडालाही पाझर फोडणारा घाणीचा स्वभाव आणि मानवी संस्कृतीला उच्च पातळीवर नेऊन ठेवणारे तिचे विचार अंतर्मुख व्हायला लावतात. सत्काकार्याचे फलित म्हणून मिळालेली स्वतःच्या सुटकेची संधी नाकारून घाणीने गुलामीत सडत असलेल्या बापासह सर्व लोकांची केलेली मुक्तता आदर्श मानवी जीवनाचा परमोच्चबिंदू आहे. प्रेमाने जगही जिंकचा येते या सुवचनाचा परिपोश तिच्या वर्तनाने सिद्ध केला आहे, तर सुडाचा लवलेशही मनात न ठेवता घाणीने खलनायकाला उदार अंतकरणाने दिलेले जीवदान औदार्याची परिसीमा गाठते.

Weight 200 g

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

You may also like…

× Whats app