छत्रपती शिवाजी महाराज यांचा वास्तविक इतिहास, सामाजिक विचार आणि राजकीय दृष्टिकोन समजून घेण्यासाठी गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” ( Shivaji Kon Hota ) हे पुस्तक एक विचारप्रवर्तक आणि वास्तवदर्शी साधन आहे. या पुस्तकात शिवाजी महाराजांचे कार्य, मूल्य, आणि जातीपातीतून वर उठलेला संघर्ष अत्यंत स्पष्टतेने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला आहे.सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांनी पुस्तक वाचल्यानंतर ते प्रचंड आवडले अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्राद्वारे कॉ .गोविंद पानसरे यांना कळवली आहे ते ही आपल्याला पुस्तकात पाहायला मिळेल.
पुस्तकाच्या नावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा केलेला एकेरी उल्लेख जरी प्रथमदर्शी खटकत असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की वाचायला हवं.
पुस्तका बद्दल सर्वसाधारण माहिती :
- पुस्तकाचे नाव – शिवाजी कोण होता ? (Who was Shivaji ? )
- लेखक – कॉ.गोविंद पानसरे ( Com.Govind Pansare )
- प्रकाशक – लोकवांग्मय गृह
- आवृत्ती – 82 वी आवृत्ती जानेवारी 2025
- वजन – 77 ग्राम
- आकार – L 22 cm , W 14 cm , H 0.5 cm
Shivaji Kon Hota पुस्तकात खालील मुद्दे वाचायला मिळतील :
1. आगळा राजा शिवाजी
2. रयतेचा कणव असलेला राजा
3. धर्म श्रद्ध पण धर्म द्वेष्टा नव्हे
4. शिवाजी. ब्राह्मण, 96 कुळी,कुळवाडी,शूद्र
5. इतिहासाचा विपर्यास का?
6. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे
वरील मुद्द्यांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सविस्तर माहिती त्यांचे विवरण या पुस्तकात दिलेला आहे.
शिवाजी महाराज यांची पत्रे :
यामध्ये शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्रांचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये खालील लोकांना त्यांनी हे पत्र लिहिलेले आहेत.
1. चिपळूणच्या जुमलेदार हवालदार व कारकुनास लिहिलेली पत्रे
2. महसुला संबंधी सुभेदारास पत्र
3. जिझिया कराबाबत औरंगजेबास पत्र
पुस्तकात उल्लेख केलेल्या मुद्द्याबाबत संदर्भ आणि टिपा या पुस्तकात दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचे कार्य कर्तुत्व या विषयांचे काही महत्त्वाचे ग्रंथ याची माहिती देखील या पुस्तकाच्या शेवटच्या पानांमध्ये दिलेले आहेत.
विविध भाषांमध्ये अनुवाद :
हे पुस्तक खालील भाषांमध्ये अनुवादित झाले आहे त्या भाषांची व अनुवादकांची माहिती खालील प्रमाणे
1. कन्नड – चंद्रकांत पोकळे
2. बंगाली – शामल भट्टाचार्य
3. उर्दू – सय्यद गाझीयोदिन
4. हिंदी –केशव महादेव सावरकर
5. गुजराती – अमृता गंगा
6. मल्याळम – के दिलीप
7. इंग्रजी – उदय नारकर
हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त:
शिवाजी महाराजांचा खरा इतिहास ज्यांना जाणून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तसेच शिवाजी महाराजांबद्दल चे चुकीच्या कल्पना व भ्रम दूर करून खरे शिवाजी महाराज यांना समजून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
Reviews
There are no reviews yet.