‘इंद्रियभोग्य विषयांवर आपली स्वाभाविक प्रीती असते. इंद्रियापलीकडील गोष्टीमध्ये मानवाला तितकीशी रुची नसते. पण जेव्हा त्या व्यक्तीला इंद्रियापलीकडील गोष्टींचे अस्फुट का होईना, दर्शन होते तेव्हा ती प्रीती इंद्रियातीत वस्तूंवर म्हणजे ईश्वरावर जडायला सुरुवात होते. तेव्हाच इंद्रियभोग्य वस्तूंवर असलेले आपले पूर्वीचे प्रेम आपण ईश्वराला भगवंताला अर्पण करतो.’
प्रेमयोग
‘निष्कपट भावाने ईश्वराचा शोध घेणे यालाच भक्तियोग असे म्हणतात. या शोधाचा आरंभ, मध्य आणि अंत प्रेम हाच असतो. ईश्वराबद्दल क्षणभर प्रेमोन्मत्त होणे आपल्यासाठी शाश्वत मुक्ती देणारे असते. भक्तिसूत्रात नारद म्हणतात, परमेश्वराबद्दलचं उत्कट प्रेम म्हणजेच भक्ती.’
भक्तियोग
‘कर्मयोगात कर्म शब्दाचा अर्थ केवळ ‘कार्य’ असाच आहे. आत्म्यातील आंतरिक अग्री, तसेच आपली शक्ती आणि ज्ञान बाहेर प्रगट करण्यासाठी भौतिक वा मानसिक आघात त्यावर केले जातात, तेच ‘कर्म’ होय. इथे कर्म शब्दाचा उपयोग व्यापक अर्थाने केलेला आहे. आपण सगळे प्रत्येक क्षणी कर्म करत असतो. आपण जे काही करतो, मग ते शारीरिक असो वा मानसिक, सगळं कर्मच असतं, ते आपल्यावर आपल्या खुणा अंकित करत जातं.’
कर्मयोग